Latest

मुंबई : मरीन लाईन्स स्थानकात लोकलचे कपलिंग निघाले; लोकल दोन भागात विभागली

निलेश पोतदार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा आज (रविवार) सकाळी मरीन लाईन्स रेल्वे स्थानकात एका 12 डबा लोकलचे कपलिंग निघाले. यामुळे लोकलचे दोन भाग झाले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लोकलच्या देखभाल दुरुस्ती आणि प्रवासी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रविवारी सकाळी 11 वाजून 2 मिनिटांच्या सुमारास मरीनलाइन्स स्थानकात लोकल प्रवेश करताना मागील बाजूचा तिसरा डबा जोडला गेला नाही. त्यामुळे लोकलचे दोन भाग झाले. ही लोकल चर्चगेटहून 10.57 वाजता बोरिवलीसाठी निघाली होती. यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ झाला आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाने तात्काळ लोकल रिकामी करून ती दुरुस्ती करीता कारशेडला नेली. दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात आल्या.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT