Latest

मुंबै बॅंक बोगस मजूर प्रकरण : पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव आहे; प्रविण दरेकरांचा आरोप

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : "जो गुन्हा झालेला आहे, त्यासंदर्भात बॅंकेच्या पदावर असताना काही लाभ घेतला गेला का? यासंबंधी प्रश्न विचारले गेले. पहिल्यापासून आम्ही सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. आमची भूमिका पोलिसांना कळली पाहिजे, त्यामुळे आम्ही सर्व उत्तरं दिली. तेच तेच प्रश्न आणि नियमबाह्य प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांना फोन येत होते. त्यामुळे ते ६-७ वेळा बाहेर येत जात होते. चौकशी दरम्यान पोलीस आयुक्तांचा चौकशी अधिकाऱ्यांवर होता. पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव दिसत आहे", असे मत प्रविण दरेकर यांनी चौकशी पूर्ण झाल्यानंतर माध्यमांना दिली आहे.

मुंबै बॅंक बोगस मजूर प्रकरणी भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे नेते प्रविण दरेकर यांची मागील ३ तासांपासून चौकशी सुरू होती. चौकशीसाठी दरेकर हे माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दाखल झालेले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवलेली होती. दरेकरांच्या समर्थनार्थ आमदार नितेश राणे, भाजपा नेते प्रसाद लाड आणि भाजपाचे कार्यकर्ते  पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल झालेले आहेत.

"प्रवीण दरेकरांची चौकशी पूर्ण होत आलेली आहे. काही वेळातच प्रविण दरेकर बाहेर येतील", अशी माहिती त्यांच्या वकिलांनी माध्यमांना दिली आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांना बोगस मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर आम आदम पक्षातर्फे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दिली होती.

राज्य सरकारच्या दबावाखाली तक्रार दाखल : प्रवीण दरेकर

माझ्यावर एफआयर दाखल करण्याची पोलिसांना खूप घाई झाली होती. त्यांच्यावर राज्य सरकारचा दबाव होता. मुख्यमंत्र्यांचा देखील कारावाईचा अट्टाहास होता. राज्य सरकारच्या दबावाखाली एफआयआर दाखल झाला, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

बोगस मजूर प्रकरण नेमकं काय?

मुंबै बॅंक निवडणुकीत दरेकर यांनी मजूर या प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. ते बिनविरोध निवडून आले होते. मात्र, मुंबई सहनिबंधकांनी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवले होते. 1997 पासून मजूर असलेल्या दरेकर यांनी आतापर्यंत बोगस मजूर म्हणून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

हे वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT