Latest

काय झाडी…काय डोंगार…काय मुक्ताई धबधबा… पर्यटकांसाठी सगळं ओक्केचं !

मोहन कारंडे

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा ओसंडून वाहत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून जोरदार पावसामुळे या धबधब्याचे नयनरम्य दृश्य पहायला मिळत आहे. डोळ्यात साठवून ठेवण्याजोगे नयनरम्य दृश्य प्रत्यक्ष पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. संततधार पावसाने डोंगररांगातून उंचावरून पडणाऱ्या शुभ्र धबधब्याचे पर्यटकांना मोहून टाकणारे रूप पाहता काय झाडी… काय डोंगर… काय मुक्ताई धबधबा पर्यटकांसाठी सगळं ओक्केचं म्हणता येईल.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्याच्या ठिकाणापासून 25 किमी अंतरावर, तर डोमागावापासून अवघ्या 2 किमी अंतरावर मुक्ताई धबधबा आहे. 'माना' समाजाचे श्रद्धास्थान असलेली मुक्ताई देवीचे मंदिर या ठिकाणच्या 'वाघाई' डोंगरावर स्थित आहे. हिरव्यागार वनराईने नटलेला आणि संतंतधार पावसाने सुमारे 40 फुटावरून कोसळणारा मुक्ताई धबधबा पर्यटकांनी फुलून जात आहे. गेली दोन वर्षे कोरोना प्रतिबंधामुळे पर्यटकांना धबधबा पाहता आला नाही.

जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने सध्या मुक्ताई धबधबा प्रवाहीत झाल्याने पर्यटकांना खुनावत आहे. दररोज येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रेरणा वीरांगना मुग्दाई ट्रस्ट तर्फे स्वयंसेवक सेवा बजावत आहेत. पर्यटकांकरीता परिसरात हॉटेलदेखील उपलब्ध आहेत.

मुक्ताई धबधब्यावर जाण्याचा असा आहे मार्ग

चिमूर ते कान्पा मार्गावरील 22 किमी अंतरावरील किटाळी गावापासून डोमागावाकडे जाणारा फाटा फुटतो. डोमा गावावरून 2 किमी अंतरावर मुक्ताई धबधबा आहे. या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाहने जातात. पायथ्यापासून धबधब्यावर पायवाटेने जावे लागते. नागपूरकडून येणाऱ्या पर्यटकांना नागपूर-नागभीड मार्गावर कान्पा येथून चिमूर मार्गे जाता येते. तसेच किटाळी वरून डोमामार्गेसुद्धा जाता येते. तर चंद्रपूरहून येणाऱ्या पर्यटकांना चिमूर मार्गोने जाता येते. धबधब्याकडे जाण्यासाठी कवडसी डाक गावाजवळून फाटा फुटतो. डोमागावरून थेट मुक्ताई धबधब्यावर जाता येते.

हेहा वाचा :

SCROLL FOR NEXT