Latest

मुख्तार अन्सारीचा मुलगा उमरला सर्वोच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील कुख्यात डॉन मुख्तार अन्सारीचा मुलगा उमर अन्सारी, याला मऊ जिल्हा प्रशासन अधिकाऱ्याला धमकाविण्याच्या आणि २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

उत्तरप्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी, अलाहाबाद उच्च न्यायालयाने उमर अन्सारीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या विरोधात उमर अन्सारीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती हृषीकेश रॉय आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने उमर अन्सारीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

तपास संस्थेने चौकशीसाठी बोलाविल्यास अन्सारीने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. उमर अन्सारीने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान १५० लोकांचा जमाव गोळा करून, मऊ जिल्हा प्रशासनाला धमकावण्याचा आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT