Latest

Mukesh Ambani : अंबानी ‘युरोपियन फुटबॉल’च्या प्रेमात! ‘हा’ क्लब विकत घेण्याची दाट शक्यता

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेडसह युरोपमधील अनेक मोठे फुटबॉल क्लब लवकरच विकले जाऊ शकतात. या क्लबच्या मालकांनी क्लब विकण्यास तयारी दर्शवली असून ते योग्य मालकाच्या शोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मँचेस्टर युनायटेड आणि लिव्हरपूलनंतर आता या यादीत आर्सेनलचेही फुटबॉल क्लबचे नावही जोडले गेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आर्सेनल क्लब खरेदी करू शकतात. (Mukesh Ambani)

ग्लेझर कुटुंबाने सुमारे तीन आठवड्यांपूर्वी मँचेस्टर युनायटेडमधील त्यांचे स्टेक विकण्याचे जाहीर केले होते. असे झाल्यास, १७ वर्षांनंतर क्लब ग्लेझर कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणाच्या तरी हातात जाईल. मध्यंतरी अशीही बातमी आली होती की, अंबानी हा क्लब विकत घेऊ शकतात, पण आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असे बोलले जात आहे की अंबानी आर्सेनलचा क्लब विकत घेऊ शकतात. (Mukesh Ambani)

जगातील १० वा सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी हा आर्सेनलचा मोठा चाहता आहे. अशा परिस्थितीत अंबानी कुटुंबाने फुटबॉल लीगमधील कोणताही क्लब विकत घेतला तर तो आर्सेनल असेल. मात्र, यावेळी अंबानी कुटुंबीय किंवा आर्सेनलकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आर्सेनलचे बहुतांश शेअर्स सध्या क्रोनके स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटकडे आहेत.

फेनवे स्पोर्ट्स ग्रुप (FSG) ने क्लबच्या विक्रीची घोषणा केली. त्यानंतर लगेचच अंबानी लिव्हरपूल विकत घेऊ शकतात असे सांगण्यात आले. या अहवालात पुढे म्हटले आहे की, क्रिकेटनंतर इतर खेळांमध्ये गुंतवणुक करण्यात भारतीयांचे प्रमाण वाढत आहे. सुमारे ९०.७ अब्ज डॉलर्सचे मालक मुकेश अंबानी यांनाही फुटबॉलमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT