Latest

धोनी आणखी 2-3 वर्षे खेळू शकतो : रोहित शर्मा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : धोनीसाठी (ms dhoni) यंदाचा हंगाम शेवटचा असणार का? अशी चर्चा रंगत असताना मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने (rohit sharma) यावर मोठे भाष्य केले आहे. 'धोनी हा पुढील दोन–तीन वर्ष तरी आयपीएल खेळण्यासाठी पुरेसा तंदरुस्त आहे,' असे सूचक विधान त्याने केले आहे. आगामी आयपीएल हंगामापूर्वी एमआयने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहितने आपले मत व्यक्त केले.

रोहित (rohit sharma) म्हणाला, 'मी गेल्या 2-3 वर्षांपासून ऐकत आलो आहे की, धोनीचे हा शेवटचा हंगाम असणार आहे. पण, मला वाटते की तो आणखी काही हंगाम खेळण्यासाठी पुरेसा तंदरुस्त आहे. त्याची खेळण्याची जिद्द आणि फिटनेस पाहता तो आयपीएलमध्ये पुढीची काही वर्षे नक्कीच खेळेल.'

एमएस धोनी (ms dhoni) हा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच सीएसकेने चार वेळा या स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तसेच, त्याने आतापर्यंत 234 सामने खेळले असून त्यात 4978 धावा केल्या आहेत.

मागील हंगामात धोनीने (ms dhoni) सीएसकेचे नेतृत्व रविंद्र जडेजाकडे सुपूर्त केले होते. त्या घटनेनंतर एक खेळाडू म्हणून धोनी आयपीएलच्या 16 व्या हंगामानंतर निवृत्ती घेईल अशी शक्यता अनेक जण अजूनही वर्तवत आहेत. पण, जडेजा 15 व्या हंगामात एक कर्णधार म्हणून अपयशी ठरला. त्यामुळे स्पर्धेच्या मध्यभागी व्यवस्थापनाने पुन्हा धोनीला कर्णधार केले होते.

SCROLL FOR NEXT