Latest

‘शरद पवारांकडे परत जाणे नाही’, खासदार सुनील तटकरे यांची स्पष्टोक्ती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत सरकारमध्ये सामील झालो आहोत. आमच्या या निर्णयाचे जनतेने देखील स्वागत केले आहे. त्यामुळे 'शरद पवारांकडे परत जाणे नाही' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार (अजित पवार गट) सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. नागपूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत बोलत होते.

सुनील तटकरे म्हणाले, "अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी सामान्य लोकांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांना २००४ मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती. मात्र, त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही. ही संधी कोणामुळे मिळाली नाही, यावर मी भाष्य करणार नाही, असे म्हणत तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला."

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT