Latest

पुणे: चोरलेल्या २१ मोटार सायकलींसह तिघे जेरबंद अटक, इंदापूर पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी

अमृता चौगुले

इंदापूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: इंदापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने इंदापूर पोलिस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या ७ लाख रुपये किंमतीच्या २१ मोटार सायकल हस्तगत करीत तिघांना अटक केली. विनोद महादेव पवार, अतुल मारूती काळे आणि योगेश मच्छिंद्र सुरवसे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पोलिस ठाणे अभिलेखावरील दुचाकी चोरी करणारे आरोपी तसेच इंदापूर शहर परिरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून तांत्रिक माहितीवरून संशयीत विनोद महादेव पवार (वय २४, रा. सरस्वती नगर इंदापूर), अतुल मारूती काळे (वय १९, रा. निमगाव, ता. माढा, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले. त्यांनी इंदापूर, टेंभूर्णी, कुर्डवाडी, फलटण परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. काही मोटार सायकल योगेश मच्छिंद्र सुरवसे (वय ३२, रा. बार्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यास विक्री केल्याची माहिती दिली. या तिघांकडून आतापर्यंत पल्सर, युनिकॉर्न, स्प्लेंडर, एचएफ डिलक्स, शाईन अशा वेगवेगळ्या कंपनीच्या अंदाजे ७ लाख रुपये किंमतीच्या २१ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत, तसेच १८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तिघे आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहायक फौजदार प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, सलमान खान, नंदू जाधव, गजानन वानोळे यांनी केली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT