Latest

Morocco vs Croatia : मोरोक्कोने बलाढ्य क्रोएशियाला बरोबरीत रोखले

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज एफ गटातील मोरोक्को आणि क्रोएशिया (Morocco vs Croatia) संघात सामना झाला. २०१८ च्‍या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारलेल्या बलाढ्य क्रोएशियाला मोरोक्कोने पहिल्याच सामन्यात बरोबरीत रोखले. या सामन्यात अनुभवी लुका मॉड्रिक सारखा अनुभवी खेळाडू संघात असूनही क्रोएशिला गोल नोंदवण्यात अपयश आले. मोरोक्कोच्या बचावपटूंनी केलेल्या अप्रतिम खेळीने क्रोएशियाचे परतवून लावले.

मोरोक्कोच्या बचावपटू ठरले भारी

सामन्यात चेंडूचा ताबा अधिक काळ आपल्याकडे ठेवून शॉर्ट पासिंगच्या सहाय्याने क्रोएशियाने (Morocco vs Croatia) विरोधी संघावर चढाया केल्या; परंतु त्यांना मोरोक्कोच्या बचावपटूंना भेदता आले नाही. त्यांनी सामन्याच्या पूर्ण वेळेत विरोधी संघाच्या गोलपोस्टवर एकूण पाच शॉट केले. त्यापैकी दोन गोलपोस्टवर होते. प्रतिउत्तर देताना मोरोक्कोने सामन्यात क्रोएशियावर एकूण आठ शॉट केले त्यांपैकी त्यांनी दोन शॉट गोलपोस्टवर मारले.

सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक चढाया रचण्याचा प्रयत्न केले; परंतु दोन्ही संघाच्या बचावपटूंनी केलेल्या कामगिरीमुळे खेळाडूंनी सामन्याचा पूर्ण वेळेत गोल डागण्यात यश आले नाही त्यामुळे हा सामना ०-० अशा बरोबरीत सुटला. या दोन्ही संघांना प्रत्येकी एक – एक गुण देण्यात आले आहेत.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT