Latest

Russian rocket strike : रशियाचा युक्रेनमधील रेल्वे स्टेशनवर रॉकेट हल्ला, ३० ठार, १०० जखमी

दीपक दि. भांदिगरे

कीव्ह; पुढारी ऑनलाईन

रशियाने युक्रेनवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. पूर्व युक्रेनमधील रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी रशियाने केलेल्या रॉकेट हल्ल्यात (Russian rocket strike) ३० हून अधिक लोक ठार झाले आहेत, तर १०० हून अधिक जखमी झाले आहेत. युक्रेनमधील नागरिकांचे देशाच्या सुरक्षित भागांमध्ये स्थलांतर सुरु असताना हा हल्ला झाला असल्याचे रेल्वे कंपनीने सांगितले.

दोन रशियन रॉकेट क्रॅमाटोर्स्क शहरातील एका रेल्वे स्टेशनवर धडकले. यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. ज्या रेल्वे स्टेशनवर हा हल्ला झाला आहे त्याचा उपयोग नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी केला जात होता.

"रशियाने डागलेली दोन रॉकेट्स क्रॅमाटोर्स्क रेल्वे स्टेशनवर आदळली. ऑपरेशनल डेटानुसार, क्रॅमाटोर्स्क रेल्वे स्टेशनवरील रॉकेट हल्ल्यात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १०० हून अधिक जखमी झाले आहेत," असे युक्रेनियन रेल्वेने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनमधील रेल्वे स्टेशनवरील हल्ल्याच्या वृत्तावर रशियाने अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. युक्रेनमधील नागरिकांवर हल्ला (Russian rocket strike) केला जात नसल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे.

डोनेस्तक प्रदेशाचे गव्हर्नर पावलो किरिलेन्को यांनी सांगितले की, रशियाने जेव्हा रॉकेट हल्ला केला तेव्हा हजारो लोकांची स्टेशनवर गर्दी होती. रशियाला (Russian fascists) दहशत आणि भीती निर्माण करायची आहे, त्यांचा एकावेळी अधिक लोकांना लक्ष्य करायचे उद्देश आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

किरिलेन्को यांनी एक फोटो ट्विट केला असून त्यात सूटकेस आणि इतर सामानांजवळ जमिनीवर अनेक मृतदेहांचा खच पडला आहे. तेथे फ्लॅक जॅकेट घातलेले सशस्त्र दलाचे पोलिस तैनात आहेत.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT