Latest

Moonlighting : एकाचवेळी गुपचूप दोन ठिकाणी जॉब करताय? ‘मुनलाईटिंग’ समजून घ्या

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : आयटी कंपन्यामध्ये मुनलायटिंगचा (Moonlighting) ट्रेंड खूप वाढलेला दिसून येतो. कोरोनानंतर वर्क फ्रॉम होममुळे याचे प्रमाण वाढत आहे. नुकेतच विप्रो कंपनीने आपल्या कंपनीतून एकावेळी मुनलायटिंगच्या नावाखाली तब्बल ३०० जणांना नोकरीवरून काढून टाकले. त्‍यामुळे पुन्हा एकदा 'मुनलायटिंग' हा विषय चर्चेत आला आहे. या अगोदर 'इन्फोसिस'ने कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांना 'मुनलायटिंग'वरुन सुनावलं होते. जाणून घेवूया मुनलायटिंग विषयी…

Moonlighting :  मुनलायटिंग पुन्‍हा चर्चेत

आयटी कंपनीमध्ये मुनलायटिंग हा विषय काय नवा नाही आहे; पण हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी विप्रो कंपनीचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. बुधवारी (दि.२१) विप्रोने आपल्या कंपनीतून मुनलायटिंगच्या नावाखाली तब्बल ३०० जणांना नोकरीवरुन काढले आहे.  हे ३०० जण विप्रोची स्पर्धक असलेल्या कंपनीत विप्रोमध्ये जे काम करत होते तेच काम करत होते. हे कार्यनिष्ठतेच्या नियमात बसत नाही, या कारणास्तव विप्रोने या ३०० जणांना शिस्तभंगाची कारवाई करत कामावरुन काढून टाकले. काही दिवसांपूर्वी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना 'नो डबल लाइव्ह्स' (No Double Live) या नावाचा ईमेल पाठवला होता. या ईमेलमध्ये म्हटलं होतं की,  एकाचवेळी दोन ठिकाणी काम करत असाल आणि ते कंपनीच्या लक्षातआल्यास त्या कर्मचाऱ्यांवर  शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच नोकरी गमवली जाऊ शकते, असा इशाराही देण्‍यात आला हाेता.  कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती पत्रामध्ये असे लिहिले आहे की, कोणताही कर्मचारी कंपनीच्‍या परवानगी घेतल्याशिवाय पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करू शकत नाही.

Moonlighting : काय आहे मुनलाईटिंग?

मुनलायटिंग म्हणजे तुम्‍ही एकाचवेळी दाेन ठिकाणी काम करणे. दुसऱ्या ठिकाणी गुप्तपणे काम करणे याला तांत्रिकदृष्ट्या 'मूनलायटिंग' असं म्हणतात. उदा. तुम्ही जर एका कंपनीत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत काम करत असाल आणि त्याचवेळेत जर तुम्ही कंपनीला न कळवता दुसऱ्याच कंपनीत एका प्रकल्पावर गुप्तपणे काम करत असाल तर त्याला मुनलायटिंग म्हणता येईल. एखादी व्यक्ती फ्रीलान्‍समध्ये एकापेक्षा अधिक कंपन्यामध्ये काम करत असेल तर ते मुनलायटिंग येत नाही. कारण ती व्यक्ती त्या कंपनीची नियमित कर्मचारी नसते. पण, कंपनीच्या नियमित कर्मचाऱ्याला मात्र पगाराबरोबर इतर सवलतीही मिळत असतात. 

कंपनीला धोका – ऋषद प्रेमजी

विप्रो कंपनीचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी अखिल भारतीय प्रबंधन संघाच्या (AIMA) राष्ट्रीय संमेलनात बाेलताना सांगितले हाेते की, "आयटी कंपनीत मुनलाईटिंग करणे हे एकप्रकारचे कंपनीला धोका आहे". तर स्विगीचे एचआर गिरीश मेनन हे मुनलाईटिंगला समर्थन करतात. ते म्हणतात, "मुनलाईटिंग धोरण सर्वसमावेशक आहे." टेक महिंद्राचे सीपी गुरनानी म्हणतात, या प्रकारातून पैसे मिळवण्याची संधी असते. पण हे काम करत असताना तुम्ही  कंपनीच्या कार्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. कोणत्याही स्वरुपाचा फ्रॉ़ड करता कामा नये.
पुण्यातील युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेट (NITES) च्या म्हणण्यानुसार, जर एखादी व्यक्ती आपली वैयक्तिक साधने वापरुन  स्वतःच्या वेळेत केलेले काम न्याय्य आहे. यासोबतच कामाच्या वेळेत कोणी असे करत असेल तर त्याला कंपनी सोबत केलेल्या कराराचा भंग म्हणता येईल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT