पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या महिन्याभरापासून पाठ फिरवलेल्या मान्सूने देशातील काही भागात 'कमबॅक' केले आहे. दरम्यान महाराष्ट्रासह, मध्य भारतात मान्सून पुन्हा दमदार 'कमबॅक' करणार असल्याची माहिती आयएमडी पुणे विभागाचे विभागप्रमुख के. एस. होसाळीकर यांनी 'X' वरून (पूर्वीचे ट्विटर) दिली आहे. (Monsoon Updates)
डॉ. होसाळीकर यांनी म्हटलं आहे की, गुरुवार १४ सप्टेंबरपासून मध्य भारतातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता आहे. दरम्यान मंगळवारी (दि. १९) गणेश चतुर्थी असून, गणेशाच्या आगमनाला 'वरुण राजा' हजेरी लावण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. (Monsoon Updates)
गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली आहे. बुधवारपासून (दि.१३ सप्टेंबर) पावसाची क्रिया पुन्हा सुरू होत आहे. दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे देखील डॉ. होसाळीकर यांनी म्हटले आहे. (Monsoon Updates)