Latest

सभागृहात परत या : नाराज लोकसभा अध्यक्षांची सर्वपक्षीय खासदारांकडून मनधरणी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : मणिपूर हिंसाचारावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अनेकवेळा गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी खासदारांकडून लोकसभेत प्रचंड गोंधळ घातला गेला. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे बरेचसे कामकाज गदारोळात (monsoon parliament session) वाहून गेले आहे. यावर नाराज लोकसभेचे अध्यक्ष ( Lok Sabha Speaker ) ओम बिर्ला ( Om Birla ) यांनी सभागृहात येणार नाही, असा निर्णय घेतला. ओम बिर्ला यांना पुन्हा सभागृहात परत यावे, अशी त्‍यांची मनधरणी आज (दि.३) सर्वपक्षीय खासदारांनी त्‍यांची भेट घेवून केली, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

गेल्या काही दिवसांपांसून लोकसभेत मणिपूर हिंसाचारावरून गदाराेळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी सदस्‍यांच्‍या वर्तनावर ओम बिर्ला हे नाराज झाले. जोपर्यंत खासदारांचे वर्तन सुधारणार नाही, तोपर्यंत लोकसभेत न येण्याचा निर्णय बिर्ला यांनी घेतला आहे. यानंतर आज लोकसभेच्या काही खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली. लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी सभागृहात (monsoon parliament session) परत यावे, अशी विनंती सर्वपक्षीय सदस्‍यांनी केली आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन, बसपचे रितेश पांडे, भाजपचे राजेंद्र अग्रवाल, तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला आणि द्रमुकच्या कनिमोझी यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट (monsoon parliament session) घेतली.

monsoon parliament session : 'ते आमचे संरक्षक' : रंजन चौधरी

'ते आमचे संरक्षक आहेत', असे म्हणत काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसक्षा अध्यक्षांना परत सभागृहात यावे, असे आवाहन केले. राजेंद्र अग्रवाल यांनी चौधरी यांचा निरोप लोकसभा अध्यक्षांपर्यंत ही विनंती पोहोचविण्याचे आश्वासन चौधरी यांना दिले आहे.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT