Latest

The Freelancer Series : मद्यपान सीन्‍स करताना मला अडचण आली-मोहित रैना

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्खनन मोहिमेवर असलेला माणूस, सीरियाच्या युद्धग्रस्त प्रतिकूल वातावरणात बंदिवान असलेली तरुण मुलगी, ती या मृत्यूच्या संकटामधून कशी सुटणार? डिस्नी+ हॉटस्टार वर्षातील सर्वात मोठी एक्सट्रॅक्शन सीरीज 'द फ्रीलान्सर' रिलीज करण्यासाठी सज्ज आहे. (The Freelancer Series) ही सीरीज शिरीष थोरात लिखित – ए तिकीट टू सीरिया या पुस्तकावर आधारित आहे, भाव धुलिया दिग्दर्शित, फ्रायडे स्टोरीटेलर्स निर्मित या सीरीजचे निर्माते व शोरनर नीरज पांडे आहेत. डिस्नी+ हॉटस्टारवर १ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होण्‍यास सज्ज आहे. 'द फ्रीलान्सर'मध्‍ये लोकप्रिय अभिनेता मोहित रैना, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि कश्मिरा परदेशी प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच या सीरीजमध्‍ये सुशांत सिंग,जॉन कोक्कन, गौरी बालाजी व नवनीत मलिक, मंजिरी फडणीस, सारा जेन डायस हे प्रतिभावान कलाकार देखील आहेत. (The Freelancer Series)

भूमिकेमध्‍ये सामावून जात भूमिकेमधील बारकाव्‍यांशी जुळून जाणे कोणत्‍याही कलाकारासाठी आव्‍हानात्‍मक आहे. 'द फ्रीलान्सर'साठी मोहित रैनाने त्‍याची भूमिका अविनाश कामतचे बारकावे समजून घेण्‍यासाठी खूप मेहनत घेतली. प्रतिभावान कलाकार त्‍याची भूमिका आणि भूमिकेसाठी कराव्‍या लागलेल्‍या तयारीबाबत सांगितले.

याबाबत सांगताना मोहित रैना म्‍हणाला, "कथानकाशी खरे राहण्यासाठी मला भूमिकेच्‍या जीवनातील सुरुवातीच्या अपयशापासून ते आयुष्य जगलेल्या आणि अनुभव घेतलेल्या प्रौढ व्यक्तीपर्यंतचा बदल दाखवावा लागला. सुरूवातीच्या जीवनासाठी आम्‍ही भूमिका कमकुवत असल्‍याचे, तर सध्‍याच्‍या जीवनात तो काहीसा नकारात्‍मक असल्याचे दाखवण्‍याचा प्रयत्‍न केला. तो निरागस असण्‍यासह जमावामध्‍ये सहजपणे सामावून जाऊ शकतो. मला मद्यपान सीन्‍स करताना नेहमी स्‍ट्रगल करावा लागला आहे, असे सीन्‍स माझ्यासाठी सोपे नाहीत. याव्‍यतिरिक्‍त कथानक अधिक अॅक्‍शन संबंधित होते आणि रोज स्थितीशी जुळवून घ्‍यावे लागत होते."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT