Latest

mohit kamboj on sushma andhare : सुषमा अंधारे-राखी सावंत बहिणी – मोहित कंबोज यांचे खोचक ट्वीट

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्‍या उपनेत्‍या सुषमा अंधारे आणि बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत बहिणी आहेत, असे खोचक ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांची थेट राखी सावंतशी तुलना करत ठाकरे गटावर निशाना साधला आहे (mohit kamboj on sushma andhare)

मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत. एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी महाराष्ट्राच्या सिनेमात. या दोघी एकमेकींच्या स्पर्धक आहेत. दोघींपैकी कोणाची चर्चा जास्त होणार यातच दोघींची स्पर्धा सुरू असते." (mohit kamboj on sushma andhare)

याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झुकेंगा नही साला घुसेंगा' असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या अंधारे यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाल्या की, "झुकेगा नही घुसेगा साला" हा डायलॉग चांगलाच आहे. पण, २०१६ पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि याचा तुम्हाला ७ वर्षे पत्ता लागला नाही, असा टोलाही अंधारे यांनी लगावला होता. देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या या टीकेला मोहित कंबोज यांनी प्रत्युतर दिले आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT