Latest

Mohammed Shami : शमीचे नाव घेताच आई अंजुम झाल्‍या भावूक, म्‍हणाल्‍या, “विश्‍वचषक ट्राफी…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍याला काही तासांचा अवधी उरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, १९ नोव्‍हेंबर २०२३ रोजी अंतिम सामन्‍यात ( World Cup Final ) भारताचा मुकाबला ऑस्‍ट्रेलियाची होणार आहे. यंदाच्‍या स्‍पर्धेत सलग १० सामने जिंकत भारतीय संघ एकमेव अपराजित संघ राहिला आहे. या स्‍पर्धेत कर्णधार रोहित शर्मा, वन-डेमध्‍ये विश्‍वविक्रमी ५० शतकांची नोंद करणारा विराट कोहली यांच्‍यासह सर्वाधक चर्चेतील क्रिकेटपटू हा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद शमी ( Mohammed Shami ) आहे.

तब्‍बल २३ बळी घेत शमी हा विश्‍वचषक स्‍पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्‍याच्‍या या कामगिरीवर आई अंजुम आरा या खूपच आनंदी आहेत. कारणही तसेच आहे एकीकडे शमी विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करत आहे. तर धाकटा मुलगा मोहम्मद कैफ याची रणजी ट्रॉफीसाठी बंगालच्या संघात निवड झाली आहे. ( Mohammed Shami Mother Anjum Ara)

विश्‍वचषक ट्रॉफी भारतातच राहणार…

शमीचे मूळ गाव उत्तर प्रदेशमधील सहसपूर अलीनगर आहे. माध्‍यमांशी बोलताना शमीचे नाव घेताच आई अंजुम भावूक झाल्‍या. त्‍या म्‍हणाल्‍या की, " गावातील प्रत्‍येक मूल क्रिकेटपटू असू शकत नाहीत, पण या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात गावाचा नावलौकिक मिळवावा, अशी माझी इच्छा आहे. प्रत्‍येक मूल माझा मुलगा शमीच सारखाच आहे. यंदाच विश्‍वचषक स्‍पर्धा भारताच्‍या मातीत होत आहे आणि भारतातच ही ट्रॉफी राहणार आहे." ( Mohammed Shami Mother Anjum Ara)

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT