Latest

टीम इंडियातील क्रिकेटपटूच्‍या पत्‍नीची सुप्रीम कोर्टात धाव, “लग्‍नानंतरही त्‍याचे तरुणींशी अनैतिक… “

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्‍मद शमी (Mohammad Shami ) याच्‍या अडचणीत वाढ झाली आहे. त्‍याची पत्‍नी हसीन जहाँने त्‍याच्‍या अटकेसाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे. कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने शमीच्‍या अटक वॉरंटवर स्‍थगिती दिली होती. याला हसीन हिने आव्‍हान दिले आहे.

पत्‍नी हसीन जहाँची सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव

मोहम्‍मद शमी ( Mohammad Shami ) हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय ) क्रिकेट दौर्‍यावेळी दिलेल्‍या रुममध्‍ये तो तरुणींशी अनैतिक संबंध ठेवायचा. ( extra-marital sexual affairs ) लग्‍न झाल्‍यानंतरही त्‍याने अनेक तरुणींची संबंध होते. त्‍याने हुंडासाठी छळही केल्‍याचा तिचा आरोप तिने या याचिकेतून केला आहे.

हसीन जहाँने दाखल केलेल्‍या याचिकेत म्‍हटले आहे की, अलीपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी २९ ऑगस्ट २०१९ रोजी शमीविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. शमीने मात्र या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले, ज्याने अटक वॉरंट आणि संपूर्ण प्रकरणातील पुढील कार्यवाहीला स्थगिती दिली. यानंतर हसीन जहाँने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली; परंतु उच्च न्यायालयानेही अटक वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. कोणत्याही सेलिब्रिटीला विशेष दर्जा मिळू नये. मोहम्‍मद शमीविरोधात केलेल्‍या तक्रारीत मागील चार वर्षांपासून या प्रकरणाची प्रगती झाली नसल्याचेही याचिकेत म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT