Latest

Modi visit Musk : ‘मी मोदींचा फॅन’ अमेरिका भेटीत एलॉन मस्क यांनी केली मोदींची स्तुती म्हणाले…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Modi visit Musk : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 21 ते 24 जूनपर्यंत अमेरिका दौऱ्यावर आहेत. काल सकाळी ते अमेरिकेसाठी निघाले होते. आज ते अमेरिकेला पोहोचले आहेत. अमेरिकेत त्यांनी उद्योगपती एलॉन मस्क यांची भेट घेतली. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेतल्यानंतर एलॉन मस्क मी मोदींचा फॅन आहे, असे म्हणत त्यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला.

या भेटी दरम्यान दोघांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याबाबत चर्चा झाली. न्यूयॉर्क येथील भेटीनंतर एलॉन मस्क यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भारताचे प्रधानमंत्री वास्तवमध्ये भारताची खूप काळजी करतात. या भेटीत त्यांनी टेस्लाला देशात महत्वपूर्ण गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित केले आहे. Modi visit Musk

एलन मस्क यांनी मोदी यांची स्तूती केली. तसेच भारताच्या भविष्याबाबत मी खूप उत्साहित आहे. मला वाटते की मी खूप जगातील अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात अधिक संभावना आहेत.

यावेळी त्यांनी त्यांच्या 2015 मधील भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. मस्क म्हणाले, ती एक शानदार बैठक होती. मोदी यांनी अनेक वर्षांपूर्वी फ्रीमोंट फैक्ट्रीचा दौरा केला होता.

मोदी हे भारतासाठी निश्चितच चांगल्या गोष्टी करू पाहत आहेत. ते नवीन कंपन्यांचे खुल्या मनाने स्वागत करत आहेत. तसेच यामुळे भारताचा फायदा होईल याकडेही ते पूर्ण लक्ष देतात. Modi visit Musk

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT