Latest

मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तरी टेन्‍शन नाही! लवकरच सुरु हाेणार नवी ‘ट्रॅकिंग सिस्टीम’

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मोबाईल फोन हरविला किंवा चोरीला गेला तर तो शोधण्‍याबरोबर ब्‍लॉक करणे हे मोठे आव्‍हान असते. या मोबाईल फोनचा गैरवापर होईल का याचे मोठे टेन्‍शन वापरकर्त्याला असते. मात्र आता हे टेन्‍शन कमी होणार आहे. कारण हरवलेला किंवा चोरीला गेलेल्‍या फोनसाठी केंद्र सरकार लवकरच खास 'ट्रॅकिंग सिस्टम' सुरु करणार आहे. ( Mobile phone tracking system  ) जाणून घेवूया या नवीन सिस्‍टीमविषयी…

केद्र सरकार या आठवड्यात ट्रॅकिंग सिस्टम सुरू करणार आहे. या प्रणालीद्वारे, देशभरातील लोक त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन 'ब्लॉक' करु शकतील तसेच त्‍याचा शोध ही घेवू शकतील, अशी माहिती दूरसंचार विभागाच्‍या वरिष्ठ अधिकाऱ्याने 'पीटीआय'शी बोलताना दिली.

Mobile phone tracking system : केव्‍हापासून सुरु होणार नवीन प्रणाली ?

टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बॉडी सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (CDOT) दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ईशान्येकडील सह क्षेत्रातील दूरसंचार मंडळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. यासंदर्भात दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, १७ मेपासून 'सीईआयआर' प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. लवकरच याची अंमलबजावणी देश पातळीवरही सुरू केली जाणार आहे दरम्‍यान, 'सीडीओटी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार उपाध्याय यांनी नवीन प्रणालीची अंमलबजावणी कोणत्‍या तारखेपासून होईल, याची पुष्टी केली नाही. मात्र ते म्हणाले की, हे तंत्रज्ञान संपूर्ण भारतात आणण्यासाठी तयार आहे. ( Mobile phone tracking system  )

Mobile phone tracking system असे करेल काम…

मोबाईल फोन ट्रॅकिंगच्‍या नवीन प्रणालीबाबत माहिती देताना राजकुमार उपाध्याय म्हणाले की, CEIR प्रणाली पुढीन तीन महिन्‍यांमध्‍ये संपूर्ण देशभर सुरु होईल. यामुळे मोबाईल फोन हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल तर त्‍याचा फोन ब्लॉक आणि ट्रॅक होणार आहे. सर्व दूरसंचार नेटवर्कवर क्लोन केलेल्या मोबाईल फोनचा वापर शोधण्यासाठी CDOT ने नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत. केंद्र सरकारने भारतात मोबाईल उपकरणांची विक्री करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख (IMEI-15 अंकी क्रमांक) जाणून घेणे अनिवार्य केले आहे. मोबाइल नेटवर्कमध्ये मंजूर IMEI क्रमांकांची सूची असेल. हे त्यांच्या नेटवर्कमध्ये अनधिकृत मोबाइल फोनची एन्ट्री शोधेल. दूरसंचार ऑपरेटर आणि CEIR सिस्टीमला डिव्हाइसचा IMEI नंबर आणि त्याच्याशी संबंधित मोबाइल नंबरवर प्रवेश असेल. त्‍यामुळे CEIR सिस्‍ट्‍म नागरिकांना चोरी झाल्यास त्यांचे स्मार्टफोन ब्लॉक करू देते. मोबाईल ब्लॉक झाला की, सरकार फोन ट्रॅक करून परत मिळवू शकते.

वापरकर्ते असे करतील हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ब्‍लॉक

चोरीला गेलेल्या मोबाइल फोनचा IMEI क्रमांक चोरटे बदलतात. अशा हँडसेटचा मागोवा घेणे आणि ब्लॉक करणे ही राष्ट्रीय सुरक्षेची समस्या होती. 'सीईआयआर 'विविध डेटाबेसच्या मदतीने नेटवर्कवरील कोणतेही क्लोन केलेले मोबाइल फोन ब्लॉक करण्यास सक्षम असेल, असेही राजकुमार उपाध्याय यांनी सांगितले. वापरकर्ते स्मार्टफोनला CEIR वेबसाइटद्वारे किंवा KYM (नो युवर मोबाइल) अॅपद्वारे Android साठी Play Store आणि iOS-चालणाऱ्या iPhones साठी Apple App Store द्वारे ब्लॉक करू शकतात.

वापरकर्त्यांनी काही अटींचे पालन करणे आवश्यक

CEIR च्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल फोन वापरकर्त्यांनी काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. मोबाईल फोन हरवला किंवा चोरीला गेला असेल तर त्‍यांनी सर्वप्रथम जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार देणे आवश्‍यक आहे. त्यानंतर, वापरकर्त्यांनी CEIR वेबसाइट आणि अॅपवर आढळलेला ऑनलाइन फॉर्म भरणे अनिवार्य आहे. यामध्‍ये मोबाइल नंबर, डिव्हाइस मॉडेल, IMEI 1 आणि 2 क्रमांक आणि फोन कुठे हरवला त्या स्थानाची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच पोलीस ठाण्‍यात दाखल केलेल्‍या गुन्‍ह्याची स्कॅन कॉपी 'सीईआयआर' वेबसाइटवर देखील मागितली जाते. CEIR वेबसाइटवर ब्लॉकिंग रिक्वेस्ट यशस्वीरित्या सबमिट केल्यावर, वापरकर्त्याचा फोन २४ तासांच्या आत ब्लॉक होतो. तसेच हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन परत मिळाल्यास, वापरकर्ता CEIR वेबसाइटच्या अनब्लॉक पर्यायात प्रवेश करून आणि इतर आवश्यक तपशीलांसह विनंती आयडी प्रदान करून डिव्हाइस अनब्लॉक करू शकतो.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT