Latest

MNS On G-20 Summit |’परदेशी पाहुण्यांनी तुम्ही दाखवलेला भारत पाहिला’, पण… मनसेकडून पीएम मोदींवर टीका

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजधानी दिल्लीत नुकतीच G20 शिखर परिषद पार पडली. या परिषदेच्या यशस्वीतेवर अनेकांनी कौतुक केले. मात्र राज ठाकरेंच्या मनसेने G20 शिखर परिषदेवर टीका केली आहे. या संदर्भातील पोस्ट मनसेने 'X' वरून (पूर्वीचे ट्विट) केली आहे. (MNS On G-20 Summit)

मनसेने केलेल्या पोस्टमध्ये भारताच्या खऱ्या परिस्थितीचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. तसेच यासोबत लिहिलेल्या मेसेजमध्ये 'परदेशी पाहुण्यांनी कदाचित तुम्ही दाखवलेला 'भारत' पाहिला असेल, पण माणुसकीने तुम्ही झाकलेला 'भारत'ही पाहिलाय !' अशी टीका केली आहे. यामध्ये भारतात सध्या माणुसकी झाकलेली असल्याचे म्हणत, मनसेने भारताचे नेमके खरे चित्र सध्यस्थितीत काय आहे? याचा व्हिडिओ शेअर केला आहे. (MNS On G-20 Summit)

दिल्लीतील प्रगती मैदानावर दोन दिवसीय G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या काळात पंतप्रधान मोदींनी अनेक देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेतल्या. पीएम मोदी यांनी द्वीपक्षीय संबंधावर अनेक देशांशी सकारात्मक चर्चा केली होती. (MNS On G-20 Summit)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT