Latest

Kirtikumar Shinde| मनसेला धक्का: किर्तीकुमार शिंदे यांनी हातात घेतली मशाल

अविनाश सुतार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर मनसेच्या सरचिटणीस पदाचा किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी राजीनामा दिला होता. आता शिंदे यांनी आज (दि.५) मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिंदे (Kirtikumar Shinde) म्हणाले की, मला शिवसेना ठाकरे गटात कोणते पद मिळेल, याबाबत एका शब्दाचीही चर्चा न करता उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भाजपविरोधात संघर्ष करत महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा स्वाभिमानी बाणा जपत आहे. सर्व समाज घटकांना स्वाभिमानाच्या आणि समतेच्या लढ्यातील सोबती मानणारे प्रबोधनकार ठाकरे यांचे व्यापक बहुजनवादी हिंदुत्व, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळापर्यंत बांधलेली शिवसेना ही चार अक्षरांची अत्यंत बळकट 'जादुई' संघटना आहे.

मोदी-शहा विरोधातील आपली परखड राजकीय भूमिका महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे कठोर परिश्रम घेत आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि महविकास आघाडी दणदणीत यश मिळवेल. पण त्याच बरोबर देशाच्या राजकारणालाही नवीन दिशा देईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT