Latest

MLC Election Result : एकनाथ खडसे विजयी; समर्थकांचा जल्लोष

backup backup

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला नुकतीच सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्याकडे जळगावकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. खडसे यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याआधीच मुक्ताईनगर शहरात त्यांच्या अभिनंदनाचे फलक लागले आहेत.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिलेली आहे. सध्या या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणी सुरु असताना तिकडे मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत. तसेच त्यांचे समर्थक देखिल जल्लोष करत आहेत. काही तासांमध्ये याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तथापि, याआधीच मुक्ताईनगरात जल्लोष सुरू झाला आहे. शहरात निकाल लागण्याआधीच खडसेंच्या अभिनंदनाचे फलक लागले आहेत. यावरून खडसे यांचा विजय निश्चित आहे याची खात्री असल्याचेच हे फलक सांगत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

खडसे समर्थक मुंबईत दाखल

एकनाथ खडसे यांचे समर्थक हे कालपासूनच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. तर काही जण आज सकाळी मुंबईत पोहचले. खडसेंचे निवासस्थान आणि विधानभवन परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने असल्याचे दिसून येत आहे. या समर्थकांना एकनाथ खडसे यांचा विजय निश्‍चित वाटत आहे. तर हेच चित्र मुक्ताईनगरातही दिसून आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT