Latest

नगर : आ. पडळकर यांना चौंडीत येण्यास पोलीस प्रशासनाकडून मज्जाव

अमृता चौगुले

जामखेड : पुढारी वृतसेवा

आ. गोपीचंद पडळकर यांना चौंडीमध्ये येण्यास पोलीस प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला आहे. त्यांना कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे अडविण्यात आले असून, तेथेच थांबविण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने त्यांना 2 नंतर चाैंडीमध्ये जाण्याची परवानगी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना 2 नंतर सोडण्यात येणार आहे.

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, चौंडीचे प्रशासन प्रस्थापित पवार घराण्याच्या दबावाखाली असल्यामुळे आमच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाही, असा आरोप करीत आ. पडळकर यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस आधीक्षक यांच्याकडे परवानगी अर्ज सादर केला होता.

त्यानुसार त्यांना 31 रोजी दुपारी 2 नंतर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आ. पडळकर हे 12 वाजण्याच्या सुमारास चापडगाव येथे आले असता त्यांना पोलीस प्रशासनाने रोखून धरल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT