Latest

तब्बल ३९ वर्ष ठाकरेंसोबत होतो, त्यांची कुंडली माहितीय : नितेश राणे

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे जितकी खालची पातळी गाठून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतील. त्याच्या खालच्या पातळीवर बोलायला नितेश राणे उभा आहे. उद्धव ठाकरे यांना दिवसा तारे दाखवण्याची तयारी आमची आहे. ३९ वर्ष उद्धव ठाकरे सोबत राहिल्याने त्याची संपूर्ण कुंडली आम्हाला माहिती आहे. जास्त बडबड करू नये. रोज कपडे फाडू शकतो एवढी माहिती आमच्याकडे आहे. असं वक्तव्य नितेश राणे यांनी केले. वर्धा जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी आले असता ते विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एक्सपर्ट कायदे तज्ञ आहेत. आदित्य ठाकरे यांना त्यांनी कायदा शिकवलेला आहे. त्यामुळे त्यांना कोणी कायदा शिकवण्याची गरज नाही. उशीर होत आहे, म्हणत खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका करत होते आज त्यांच्याच समोर जाऊन बसावं लागत आहे. कुणी कितीही विरोध केला तरी आमचे सरकार २०२४ पर्यंत टिकणार आहे. यापुढेही महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावाही आमदार नितेश राणे यांनी यावेळी बोलताना केला.

मराठा समाजाचं हित हे जरांगे पाटलांना माहित आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवावा. कुठल्याही समाजाला कुठलीच अडचण होणार नाही. ते नक्कीच न्याय देतील. हिंसक आंदोलनात जेष्ठ पत्रकार, उबाठाचे लोक त्यामागे आहेत. याचे पुरावे मिळतील. जाणीवपूर्वक सामाजिक आंदोलनातून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला. दरम्यान, ज्या दिवशी पाटणकर काढा निघेल, त्या दिवशी ठाकरे मातोश्री बाहेर पडणार नाहीत. एवढी काळजी स्वतःच्या आमदारांची घेतली असती तर ही वेळ आली नसती, असाही टोला आ. राणे यांनी ठाकरेंना लगावला.

इंडिया बैठक बाबतीत बोलताना सनातन धर्मावर टीका करणाऱ्या डीएमकेच्या अभिनंदनचा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या बैठकीत घेतला गेला. हे सनातन आणि हिंदू धर्माविरोधात लढण्यासाठी संपवण्यासाठी हे अलायन्स तयार झाले आहे. हे चित्र आता स्पष्ट होत असल्याचे आ. राणे म्हणाले.

…नाहीतर रोहित पवार माजी आमदार !

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर केलेल्या टिप्पणीवर बोलताना अद्याप रोहित पवार हे सिनियर केजीत आहेत. शाळेत पोहचले नाहीत. त्यांना मिशा आणि कंठी फुटलेला नाही आताच अंड्याच्या बाहेर पडलेले आहे. त्यांनी आधी विदर्भच नव्हे तर इतरत्र फिरावे, अनुभव घ्यावा प्रणिती शिंदे काय बोलल्या त्यावर लक्ष घालावं. अस काही तरी बोलत फ़िरण्यापेक्षा थोडं कर्जतमध्ये लक्ष घालावे, जेणेकरून माजी आमदार ही पाटी लावण्याची वेळ पडणार नाही, असा टोला आ. राणे यांनी रोहित पवारांना लगावला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT