Latest

Mitchell Starc : जखमी बोटाने गोलंदाजी करून स्टार्कने दिले टीम इंडियाला आव्हान (व्हिडिओ)

Shambhuraj Pachindre
पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदूर येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील सामना सुरू आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात  ऑस्ट्रेलियन संघात काही बदल पाहायला मिळाले. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार पॅट कमिन्स यांच्या जागी अष्टपैलू कॅमरून ग्रीन आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना संघात स्थान देण्यात आले. मिचेल स्टार्क दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नव्हता. तिसऱ्या सामन्यात त्याने संघात पुनरागमन केले. (Mitchell Starc)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा तिसरा कसोटी सामना दि. १ मार्चपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ पहिल्या डावात सर्वबाद झाले. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर मिचेल स्टार्क पहिल्याच षटकात दुखापतग्रस्त झाला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ १९७ धावांवर गारद झाला. यासह त्यांनी भारतीय संघावर ८८ धावांची आघाडी घेतली. तत्पूर्वी भारतीय संघाचा पहिला डाव १०९ धावांवर आटोपला होता. (Mitchell Starc)
दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले तर, गोलंदाजी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क मैदानात आला. यावेळी स्टार्कच्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याचे दिसत होते. तरीदेखील तो गोलंदाजी करत होता. दुखापतीमुळे त्याच्या बोटातून रक्त येत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दुखापत असताना सामन्यात गोलंदाजी केल्यामुळे स्टार्क सध्या चर्चेत आला आहे.
हेही वाचा;
SCROLL FOR NEXT