Latest

Harshita Gaur : ‘मिर्झापूर’च्या डिंपीला मिळाली मोठी संधी, या सीरीजमध्ये… 

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीरीज 'जहानाबाद – ऑफ लव्ह अँड वॉर' मध्ये कस्तुरी मिश्राची भूमिका साकारत असलेली हर्षिता गौरला लोक तिच्या नावाने कमी आणि भूमिकेमुळे अधिक ओळखतात. (Harshita Gaur) हिने 'मिर्झापूर' या सीरीजमध्ये डिंपीची भूमिका साकारली होती. ते पात्र इतके लोकप्रिय झाले की, लोक हर्षिता गौरला डिंपी म्हणून ओळखू लागले. (Harshita Gaur)

हर्षिता गौर म्हणते, 'जेव्हा लोक मला माझ्या पात्राच्या नावाने ओळखतात तेव्हा मला आनंद होतो. सध्या लोक मला 'सदा हक'मधील संयोगिताच्या व्यक्तिरेखेवरून ओळखतात. त्यानंतर जेव्हा लोकांनी 'मिर्झापूर' पाहिला तेव्हा त्यांनी मला डिंपीच्या व्यक्तिरेखेवरून ओळखले. मी या दोन्ही नावांनी परिचित आहे. मला 'जहानाबाद – ऑफ लव्ह अँड वॉर' इतके यशस्वी करायचे आहे की, लोक मला त्यातील कस्तुरी मिश्रा या नावाने ओळखतील. कस्तुरी मिश्रा ही एक मुलगी आहे जी तिच्या स्वप्नांच्या दुनियेत राहते. तिला समाजातील वास्तवाची पूर्ण जाणीव आहे. प्रेम आहे, रागही आहे आणि द्वेषही आहे. तिला असे वाटते की तिच्यासाठी काहीही अशक्य नाही. आजही आपला समाज जातीवादाच्या विळख्यात अडकला आहे, कुठेतरी कथेचा फोकसही यावरच आहे.

दिल्लीत शिकत असताना हर्षिता गौरला 'सदा हक'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. हर्षिता गौर म्हणते, 'मला नेहमीच अभिनय करायचा होता. मी कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा स्टार प्लसची टीम आमच्या कॉलेजमध्ये ऑडिशनसाठी आली होती. ज्या शोसाठी मी ऑडिशन दिले होते त्यात मला काम मिळाले नाही, पण त्याच ऑडिशनमुळे मला 'सदा हक'मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि हा शो अडीच वर्षे चालला. मी पण मुंबईला येण्याचा विचार करत होते. मुंबईत येताच माझ्याकडे काम होते. माझा प्रवास 'सदा हक'पासून सुरू झाला. शो संपला आणि त्यानंतर खरा संघर्ष सुरू झाला. मुंबईत काम कसे मिळेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हिट शो केल्यानंतर प्रत्येक कलाकाराला वाटतं यापेक्षा चांगलं काय करायचं? हर्षिता गौरलाही हाच त्रास होता. ती म्हणते, 'सदा हक'सारखे हिट शो केल्यानंतर वर्षभर माझ्याकडे काम नव्हते. दरम्यान, काही ऑफर आल्या, पण काही काम झाले नाही. त्यानंतर २०१७मध्ये ओटीटी सुरू झाली. 'मिर्झापूर'साठी कास्टिंग फायनल झाले. काही काळ शो सुरू होऊ शकला नाही, मग एके दिवशी मला डिंपीच्या भूमिकेसाठी फोन आला. मी त्याच्या तीनही सीझनमध्ये काम केले.

हर्षिता गौरचा लहानपणापासूनच अभिनयाकडे कल होता. हर्षिताने वयाच्या सहाव्या वर्षापासून कथ्थक करायला सुरुवात केली. तिने स्टेजवर अनेक परफॉर्म केले. जेव्हा लोक कौतुक करू लागले. हर्षिता माधुरी दीक्षितची मोठी फॅन आहे. माधुरी दीक्षित व्यतिरिक्त हर्षिता गौर ही तब्बू, काजोल आणि प्रियांका चोप्राची मोठी फॅन आहे. ती म्हणते, 'माधुरी दीक्षित, तब्बू, काजोल आणि प्रियांका चोप्रा यांच्या चित्रपटांचा माझ्या करिअरवर खूप प्रभाव पडला आहे. मला शाहरुख खानचा 'दिल तो पागल है' चित्रपट पाहिल्याचे आठवते. मला हा चित्रपट इतका आवडला की, मी तो अनेकवेळा पाहिला.

सूत्रांच्या माहितीनुसार, हर्षिता गौरच्या घरात सर्वच डॉक्टर आहेत. पण, हर्षिता डॉक्टर झाली नाही. तिने अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT