Latest

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पाच आरोपींना अटक

निलेश पोतदार

पालघर : पुढारी वृत्तसेवा- अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघर तालुक्‍यातील एका  गावात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी पाच तरुणांना सातपाटी पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

अल्‍पवयीन मुलीला काही तरुणांनी जबरदस्तीने  निर्जनस्थळी नेले. त्यानंतर तिच्यावर 11 तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलीने रुणांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली .

या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, सहा आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपी पालघर तालुक्यातील माहीम, हनुमान पाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील आहेत. बहुतांश तरुण नशेच्या आहारी गेल्याचे देखील कळते. या प्रकरणी  तपास सातपाटी पोलीस करीत आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT