Latest

मंत्री मुनगंटीवार आज दिवसभर नाशिकमध्ये

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सोमवारी (दि. २९) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते गोदाआरतीसंदर्भात बैठक घेणार आहेत. तसेच सार्वजनिक वाचनालयातर्फे मंत्री मुनगंटीवार यांना कार्यक्षम आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मंत्री मुनगंटीवार हे दिवसभर नाशिकमध्ये असणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. सकाळी ११.३० वाजता त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. त्यानंतर गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात दुपारी 1.45 वाजता जटायू संवर्धन प्रकल्प सन्मान सोहळ्यास ते उपस्थिती लावतील. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 4 वाजता गोदाआरतीसंदर्भात मुनगंटीवार हे बैठक घेतील. या बैठकीनंतर सायंकाळी 6 ला नेहरू गार्डन येथील परशुराम साइखेडकर नाट्यगृहात सावानाच्या कार्यक्रमाला मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात सावानातर्फे २०२१-२२ चा कार्यक्षम आमदार पुरस्कार मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. रात्री 8 ला ते मुंबईकडे प्रयाण करतील. मंत्री मुनगंटीवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT