Latest

भ्रष्टाचार-घराणेशाही-तुष्टीकरण ‘चले जाव’ : अमित शहांचा विरोधकांवर हल्‍लाबाेल

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज ९ ऑगस्‍ट आहे. या दिवशी ब्रिटिशांना भारतातून चले जाव, असा आदेश देण्‍यात आला होता. देशात  २०१४ पूर्वी झालेल्‍या लाेकसभा निवडणुकीचे निकाल हे भ्रष्‍टाचार विरोधी आणि घराणेशाही विरोधात होते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी विकासाला प्राधान्‍य दिले आहे. आज भ्रष्‍टाचार चले जाव, घराणेशाही चले जाव आणि तुष्‍टीकरण चले जाव असा नारा दिला आहे, अशा शब्‍दांमध्‍ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लाेकसभेत विराेधी पक्षांवर हल्‍लाबाेल केला. लोकसभेत आज (दि. ९) अविश्वास प्रस्तावावर चर्चा  करताना ते बाेलत हाेते. ( Amit Shah Speech in Lokshabha)

यावेळी त्‍यांनी लाकसेभत असलेल्‍या अविश्‍वास प्रस्‍तावांचा इतिहासही सांगताना कोणत्‍याही प्रकारे सत्तेत राहणे एवढेच काँग्रेसचे काम आहे, असा आरोपही अमित शहा यांनी केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या सरकारनेही अविश्‍वास प्रस्‍ताव केवळ १ मतांनी त्‍यांचा पराभव झाला. आम्‍ही लोकशाहीतील निर्णयाचा आदर राखला. कोणताही दबाव न आणता आम्‍ही तो स्‍वीकारला. जनतेला हे सर्व माहिती आहे. एका मताने परभव झाला मात्र पुन्‍हाआम्‍ही बहमताने निवडूण आालो,. देशाती जनतेला सर्व माहिती आहे, केवळ भ्रष्‍टाचाराचा जोरावर काँग्रेसने सत्ता अबाधित ठेवली, असा आरोपही त्‍यांनी केला. ( Amit Shah Speech in Lokshabha)

जनतेचा भाजपवर विश्वास

दोन तृतियांश बहुमताने भारतीय जनता पार्टीची निवड झाली आहे. पहिल्यांदा या देशातील जनतेने इतक्या मोठ्या लोकसंख्येने निवडून दिलेले आहे.  पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍यावर देशभरातील लोकांचे प्रेम आहे.  ५०हून अधिक असे निर्णय मोदींनी घेतलेले आहेत जे अधुनिकतेकडे घेऊन जाणारे आहेत, असा दावाही त्‍यांनी केला.

गरीब जनतेच्या समस्या सोडविण्याचे उल्लेखनीय कार्य

एक वेळ होती आमची सत्ता गेली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍या नेतृत्वानंतर आम्ही पुन्हा कम बॅक केले. काँग्रेसने गरीबी हटावोचा नारा दिलेला होता मात्र कित्येक वर्ष उलटूनही देशातील गरीबांची  गरिबी दूर झाली नव्हती. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने हे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. देशांच्या काेट्यवधी गरीब लोकांसाठी भरभरुन योगदान दिले आहे. ११ कोटी गरीब जनतेच्या समस्या सोडविण्याचे उल्लेखनीय कार्य मोदींनी केलेले आहे. हर घर नल योजनेच्या माध्यमातून पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, असेही ते म्‍हणाले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी

काँग्रेस शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासने दिली जात होती. मात्र किती लोकांना यांनी कर्जमाफी दिली. हे मुख्य काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले की नाही हे देशातील सर्व शेतकरी वर्गच सांगले, असेही शहा यांनी  या वेळी नमूद केले.

राहूल गांधींची 'ती' फक्त जाहिरातबाजी

एका गरीब व्यक्तीच्या घरी जाऊन राहूल गांधींनी जेवण केलं होतं. चांगली गोष्ट आहे. मात्र याची जाहिरातबाजी करुन घरी राहूल गांधी प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचं सरकार गरीबांना सुविधा देतं. घर, पाणी, वीज आणि शिक्षण यासाठी भरीव योगदान आमच्या सरकारने दिलेले आहे असे गृहमंत्री शहा यावेळी म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT