Latest

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर पोलिसांचा दणका

backup backup

ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद ए मुस्लिमीनचे ( एआयएमआयएम ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची नंबर प्लेट नसलेली गाडी शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गाडी अडवून 200 रूपयाचा दंड ठोठावला. त्यामुळे सोलापूरात कायद्याचे राज्य आहे अशी चर्चा शहरात सुरू झाली.

एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिरात सभा होती. ओवेसी हे सोलापूरात आल्यानंतर सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात गेले. त्या ठिकाणी बंदोबस्तास असलेले शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ओवेसी यांच्या गाडीला नंबरप्लेट नसल्याचे पाहिले होते. त्यानंतर असदुद्दीन ओवेसी हे हुतात्मा स्मृती मंदिराकडे जात असताना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ओवेसी यांची गाडी अडविली. गाडीला नंबरप्लेट असल्याशिवाय सभेच्या ठिकाणी जाता येणार नाही. त्यामुळे एमआयएमच्या स्थानिक नेत्यांंनी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना 200 रूपयाचा दंड भरून वाद वाढवू दिला नाही. ओवेसी यांच्या गाडीत असलेली नंबरप्लेट बसविली.

हेही वाचा : 

यावेळी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी, एमआयएमच्या शहरातील पदाधिकार्‍यांना सांगितले की, सोलापुरात कायद्याचे राज्य आहे. येथे सारे काही नियमानेच चालेल असं बजाविण्यात आले. तेव्हा शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शासकीय विश्रामगृहातून ओवेसी यांची गाडी सोडली. तेव्हा ओवेसी हे हुतात्मा कडे रवाना झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT