Latest

Isha Malviya : ‘बिग बॉसच्या बाथरूममध्ये मायक्रोफोन होते’, ईशा मालवीयचा…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १७ शोचा समारोप झाला. हा शो मुनव्वर फारूकीने जिंकला. (Isha Malviya) इतर स्पर्धकदेखील लोकप्रिय ठरले. या स्पर्धकापैकी एक नाव ईशा मालवीयचे देखील आहे. (Isha Malviya)

संबंधित बातम्या-

उडारिया सारख्या मालितेक ईशा मालवीय दिसली होती. भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया सोबत एक पॉडकास्ट दरम्यान बिग बॉसच्या घरातील काही रहस्य शेअर केले गेले आहेत. तिने सांगितलं की, बाथरूम्समध्ये मायक्रोफोन लावण्यात आले होते. बाथरूममध्ये स्पर्धकाने केलेली बातचीत देखील हा मायक्रोफोन कॅप्चर करायचा. ईशाने सांगितलं की, जर कुणी स्पर्धक बाथरूमच्या आत त्यांना दिलेला माईक वापरत नसेल, तरीही तिथे लावण्यात आलेले मायक्रोफोन ऑडिओ कॅप्चर करू शकत होते.

बातचीत दरम्यान भारती आणि हर्षने ईशाला प्रश्न विचारला की, जेव्हा वीकेंड का वार एपिसोडमध्य़े तिला रागवण्यात आलं होतं. ईशाने सांगितलं की, सुरुवातीला जेव्हा सलमान खानने तिला रागवलं होतं, तेव्हा तिला खूप दु:ख झालं होतं. ती खूप रडली आणि हा शो सोडण्याचाही विचार केला होता. अभिनेत्रीने सांगितलं की, ती रडण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. त्यामुळे कॅमेऱ्यात कैद झाले नाही. आता तिला वाटे की, तिने सर्वांसमोर रडायला पाहिजे होते. त्यामुळे तिला कदाचित सहानुभूती मिळू शकली असती. ईशाने सांगितले की, करण जोहरची टीकेने तिच्यावर प्रभाव टाकला होता.

SCROLL FOR NEXT