Latest

MHT CET 2024 : लोकसभा निवडणुकीमुळे सीईटीच्या तारखांत बदल; पाहा नवीन वेळापत्रक

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सीईटी सेलने परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. आतापर्यंत १० परीक्षा झाल्या असून एप्रिल आणि मे महिन्यात होत असलेल्या ८ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल केला आहे. पीजीपी-/एम.एससी / एम. एमसी (पी अँड ओ) या सीईटी तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

सीईटी सेलने सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले असून सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली एमएचटी सीईटी यापूर्वी १६ एप्रिल रोजी सुरु होणार होती आणि ३० एप्रिलला संपणार होती. आता ही परीक्षा २२ एप्रिलनंतर होणार आहे.

पीसीबी गटाची परीक्षा २२, २३, २४, २८, २९, ३० एप्रिल या तारखांना होणार आहे. तर पीसीएम गटाची परीक्षा २, ३, ४, ५ मे, ९, १०, ११ मे, १५,१६ मे रोजी होणार आहे. एएसी सीईटीची त्याच तारखेला म्हणजे १२ मे रोजीच होणार आहे. बीए/बीएससी, बीएड (४ वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) ची सीईटी २ मे रोजी होणार होती. ती आता १७ मे रोजी होणार आहे. एलएलबी (पाच वर्षे) ही परीक्षा ३ मे रोजी होणार होती. आता नव्या तारखांमध्ये १७ मे रोजी होणार आहे. सुधारित वेळापत्रकांची माहिती विद्यार्थ्यांनी घेवूनच परीक्षेला उपस्थित राहावे, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

सुधारित तारखा अशाप्रमाणे…

  • एमएचटीसीईटी पीसीबी ग्रुप २२, २३, २४, २८, २९, ३० एप्रिल
  • पीसीएम ग्रुप : २, ३, ४, ५ मे, ९, १०, ११ मे, १५,१६ मे
  • एएसी सीईटी – १२ मे
  • बीए/बीएससी, बीएड (४ वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) १७ मे
  • एलएलबी (पाच वर्षे) १७ मे
  • नर्सिंग सीईटी – १८ मे
  • बीएचएमसीटी सीईटी – २२ मे
  • बी. बीसीए/बीबीए/बीएमएस / बीबीएम-सीईटी २७ ते २९ मे
  • पीजीपी-सीईटी/एम.एससी (ए अँड एसएलपी)-सीईटी/एम. एमसी (पी अँड ओ) तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT