Latest

MH CET Law 2024 : विधीच्या सीईटीची तारीख बदलली; आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने नुकतेच काही सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले होते. त्यामध्ये विधी पाच वर्षे सीईटी परीक्षा २२ मे रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा सीईटी सेलने संबंधित परीक्षेची सुधारीत तारीख जाहीर करत परीक्षा ३० मे रोजी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी सीईटी सेलमार्फत विधी पाच वर्षे या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा राज्यातील तसेच राज्याबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर २२ मे रोजी घेण्यात येणार होती. परंतु सीईटीची २०२४ ची कायदेविषयक चाचणी परीक्षा आणि विधी ५ वर्षे सीईटी परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने अनेक उमेदवारांनी सीईटी सेलला विधी पाच वर्षे सीईटी परीक्षेची तारीख बदल करण्याची विनंती केली. त्यामुळे विधी पाच वर्षे सीईटी परीक्षेची तारीख आता २२ मे ऐवजी ३० मे करण्याचा निर्णय सीईटी सेलच्या वतीने घेण्यात आला आहे. संबंधित सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे कळवण्यात येईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT