Latest

MG Comet EV :एमजी कॉमेटच्या कार चाहत्यांना खुशखबर! नवीन एडिशनमध्ये केला ‘हा’ बदल

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : एमजी (Morris Garages) मोटर इंडियाने भारतात Comet EV चे विशेष गेमर एडिशन लॉन्च केले आहे. कंपनीने या नव्या कारची सुरुवातीची किंमत ८.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. कॉमेटची सध्या आलेली ही विशेष एडिशन आहे. याचे कारण म्हणजे यामध्ये विशेष असे काही फिचर आणि कलरमध्ये वेगळेपण आढळून येणार आहे. जाणून घेऊया एमजीच्या या कारच्या गेमर मॉडेलविषयी अधिक माहिती.

MG Comet EV ची नवीन सुधारित आवृत्ती कंपनीने सादर केली आहे. या कारमध्ये डिझाईन आणि रंगामध्ये बदल केलेला आहे. याच्या किंमतीमध्ये देखील बदल केलेला आहे. कंपनीच्या पेस, प्ले आणि प्लश यासारख्या मॉडेलच्या तुलनेत नव्या कॉमेट एडिशला ६४,९९९ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

MG Comet EV कधी आली?

कंपनीने मे-2023 मध्ये ही कॉमेट ही कार लॉन्च केली. या कारची सुरुवातीची किंमत 7.98 लाख रुपये इतकी ठेवलेली होती. एमजीची ही कार टाटाच्या Tiago EV पेक्षा सुमारे 50 हजार रुपये स्वस्त आहे. ही EV पूर्ण चार्ज केल्यानंतर 230 किमीचे मायलेज देते. त्यामुळे कंपनीने 519 रुपयांमध्ये ही कार 1000 किमी धावेल असा दावा केला आहे. कॉमेट EV ची गेमर एडिशन 5,000 रुपये टोकन मनी देऊन ऑनलाइन किंवा MG डीलरशिपवर बुकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे.

कसे असेल एम जी कॉमेटचे गेमर एडिशन?

एमजी कंपनीच्या मते, कॉमेटचे विशेष आवृत्ती गेमर मॉर्टल म्हणून प्रसिद्ध असलेल्या नमन माथुर यांनी सादर केली आहे. कंपनीने या EV गेमिंग एडिशनचे फोटो शेअर केले आहे. या आवृत्तीची रचना नियमित आवृत्तीपेक्षा वेगळी आहे. या कारच्या चाकावर आणि बी-पिलरवर वेगळी रचना दिसून येत आहे. या कारमध्ये विशेष गेमिंग फिचर मिळणार आहे.

कॉमेट EVच्या गेमिंग एडिशनच्या आतील केबिनला निऑन लाइट्स पहायला मिळतील. यामध्ये गेमिंग एलिमेंटचा वापर करण्यात आला आहे. तसेच साइड मोल्डिंग्ज, कार्पेट मॅट्स, इंटीरियर इन्सर्ट टूल्स, बॉडी ग्राफिक्स, स्टीयरिंग व्हील कव्हर्स आणि सीट कव्हर्स यांसारख्या विशेष अॅक्सेसरीज आणि गार्निशिंग समावेश असलेले वैशिष्ट्य पूर्ण असे डिझाईन पहायला मिळेल.

कॉमेट एमजी सर्वात स्वस्त, सर्वात लहान EV | Comet MG Price and Size

एमजी कॉमेट ही कंपनीची सर्वात स्वस्त, लहान आणि एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार आहे. याची लांबी 3 मीटर, उंची 1,640 मिमी आणि रुंदी 1,505 मिमी आहे (Comet EV Size : Length x Width x Height (mm) 2,974 x 1,505 x 1,640). यामध्ये नेक्स्ट लेव्हल पर्सनलायझेशन देण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही कंपनीने बनवलेले मजेशीर बॉडी रॅप्स, स्टिकर्स कारवर लावता येईल.

या कारला दाेन दरवाजे असतील, तसेच समोरच्या बाजूला एलईडी हेडलॅम्प, एमजी लोगो, डेटाइम रनिंग लॅम्प, मागील बाजूस एलईडी टेल लाइट्स, 12-इंच एअरोडायनामिकली डिझाइन केलेले स्टील व्हील, बाजूला व्हील कव्हर्स, क्रोम डोअर हँडल, समोर आणि मागील पार्किंग कॅमेरे. आहे. एमजी झेडएस ईव्ही नंतर एमजीची ही दुसरी ईव्ही आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT