Latest

Meta कंपनीला १.२ अब्ज डॉलरचा दंड, जाणून घ्‍या काय आहे प्रकरण?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : युरोपियन युनियनने फेसबुकची कंपनी मेटावर डेटासंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. डेटा ट्रान्सफर केल्यामुळे मेटाला  १.२ अब्ज डॉलरचा दंड युरोपीयन युनियनकडून ठोठावण्यात आल्‍याचे वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे. (Meta Fined)

याप्रकरणी अधिक माहिती देताना आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनने म्हटले आहे की, "मेटा (Meta Fined) या कंपनीने युरोप आणि अमेरिका दरम्यानचा डेटा ट्रान्सफर करून युरोपीयन युनियनच्या डेटा संरक्षण नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे  ही कारवाई करण्यात आली आहे."

आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनकडून २०२० पासून याची चौकशी करण्यात येत आहे. मेटा आयर्लंडने (Meta Fined) व्यक्तींचा वैयक्तिक डेटा युनायटेड स्टेट्समध्ये हस्तांतरित केल्याचे तपासात समोर आले आहे. या वर्षाभरात युरोपियन युनियनकडून मेटाला तिसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT