Latest

Instagram Winner : मेटा कंपनीने जयपूरच्या विद्यार्थ्याला जाहीर केले ३८ लाखांचे बक्षीस

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर अलिकडच्या काळात अनेक युजर्स हे हॅकर्सच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. मेटा कंपनीने इन्स्टाग्रामवरील बग्स शोधून काढल्याबद्दल जयपूर येथील एका विद्यार्थ्याला 38 लाखांचे बक्षीस (Instagram Winner) दिले आहे. या इन्स्टाग्राम युजर्सच्या खात्यात काही त्रुटी आल्यानंतर जानेवारीमध्ये इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील बग असल्याचा शोध त्याने लावला त्यानंतर त्याने मेटा कंपनीला या बाबतची तक्रार केली होती.

कंपनीने या समस्याचे निरसन करण्याकरिता जयपूरच्या विद्यार्थ्याला आढळून येणाऱ्या त्रुटींचा डेमो शेअर करण्यास सांगितले. त्याने दिलेल्या 5 मिनिटांच्या व्हिडिओ डेमोमध्ये असे दिसून आले की, कोणत्याही परवानगीविना इन्स्टाग्राम खात्यातील माहिती बदलली जात आहे. या प्रकाराचा सखोल तपास केल्यानंतर फेसबुकने 11 मे रोजी त्याने दिलेल्या त्रुटींची माहिती स्विकारून 38 लाखांचे बक्षीस दिले. (Meta Winner)

इन्स्टाग्राममध्ये एक त्रुटी (Bug) येत असल्याचे आढळून आले. या बग्सद्वारे युजर्सच्या रिल्सवर एक लघुप्रतिमा (thumbnail) पाठवली जाते, त्यानंतर अपोआप खात्यातील माहिती बदलली जाते. सोशल मीडियावरील आयडीच्या पुराव्याच्या आधारे ही माहिती बदलली असती तर यामध्ये युजर्सद्वारे हे बदलले असं समजू शकलो असतो. पण या घटनेमध्ये जे घडलं ते कोणत्याही युजर्सच्या बाबतीत घडलं असते. त्यामुळे डिसेंबर 2021 पासून विद्यार्थ्याने या त्रुटीचा शोध लावण्याचा ध्यास धरला. खूप प्रयत्नानंतर 31 जानेवारी रोजी सकाळी या त्रुटीचा (Bug) शोध लागला. त्यानंतर इन्स्टाग्राम खात्यावर येत असणाऱ्या समस्येचा शोध लागलेला अहवाल मेटा म्हणजेच फेसबुक कंपनीला पाठवला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT