एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करणे हाच या संपावरील अंतिम तोडगा असेल. त्यामुळे सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर आंदोलनाचे स्वरूप आणखी तीव्र करू, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. तसेच, या संपाचा गिरणी संप होऊ देणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने "एक सढळ मदतीचा, अढळ हात" या उपक्रमाअंतर्गत स्वारगेट जवळील एसटी कॉलनीतील 200 एसटी कर्मचारी यांच्या कुटुंबाला 1 महिन्याच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जगदीश मुळीक, धीरज घाटे, स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे, रघुनाथ गौडा, एसटी कर्मचारी संजय मुंडे व एसटी कर्माचाऱ्याचे कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, एसटी आंदोलनात मानवतेच्या भावनेतून पाहिलं तर सरकार वेडेपिसे झाले आहे. सरकारला सुचायचे बंद झाले आहे. या संपामुळे शरद पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एसटीची मोठी मान्यताप्राप्त असलेली संघटना पवारांची आहे.आजपर्यंत पवार यांनी मान्यताप्राप्त संघटनेला हाताशी धरून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. पण कर्मचाऱ्यांना आता अन्यायाची जाणीव झाली आहे
तसेच, सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, रोज नव्या पुड्या सोडत आहेत. कर्मचारी फुटत नाहीत म्हणून खासगीकरणाची चर्चा करत आहे. एसटीतला भ्रष्टाचार थांबवला तरी राज्य सरकार इतका पगार मिळू शकेल. महामंडळ बापाजाद्याची जहागिरी आहे का? ३८ आत्महत्या झाल्या तरी दुःख संपत नाही, हे दुर्दैव आहे.संपाचे नेतृत्व कर्मचारी करत आहेत. सरकारशी चर्चेशी तयारी पण सरकारला मार्ग काढायचा नाही.
हे ही वाचा :