Latest

Meghalaya Earthquake: मेघालयातील पूर्व गारो टेकड्यांमध्ये सौम्य भूकंपाचा धक्का

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: मेघालयातील पूर्व गारो हिल्समध्ये (टेकड्या) दुपारी २.३७ वाजता सौम्य भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू १२ किमी खोलीवर होता, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Meghalaya Earthquake)

मेघालयाचा बहुतांश भाग पर्वतीय असून तेथे गारो, खासी व जैंतिया या प्रसिद्ध टेकड्या आहेत.या भागात गारो जमातीचे लोक राहतात. मेघालयातील पूर्व गारो टेकड्यांमध्ये नोक्रेक हे सर्वोच्च शिखर आहे. (Meghalaya Earthquake)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT