Latest

Measles : मुंबईत गोवर रुग्णांची संख्या १८४ वर, शनिवारी आढळले ८ गोवरबाधित बालके; घनदाट झोपडपट्ट्यांत साथीचा फैलाव

backup backup

Measles : मुंबई : पुढारी वृत्तसेवा, मुबईतील पूर्व उपनगरांतील झोपडपट्टयांमध्ये गोवरचा जोर वाढलेला आहे. शनिवारी आणखी ११ बालरुग्ण आढळले. एम. पूर्व विभागातील गोवंडी, वाढली आहे. मानखुर्द, एच. पूर्व विभागातील सांताक्रुज, वांद्रेतील प्रत्येकी २ आणि जी. दक्षिण धारावी व एस वॉर्डमधील भांडुप, विक्रोळी या वॉर्डातील प्रत्येकी १ बालरुग्णाचा त्यात समावेश आहे. गोवंडी आणि सांताक्रुज, वांद्रे पूर्वतील बेहराम पाडा, गरिब नगर या अरूंद आणि दाटीवाटीच्या झोपडपट्टयांमध्येही गोवरबाधित रुग्ण आढळू लागल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.

Measles : मुंबईत आजपर्यंत निदान झालेल्या गोवर रुग्णांची संख्या १८४ वर पोहोचली असून, एम. पूर्व, एफ. उत्तर, जी. उत्तर, एल, एम, पश्चिम, पी. उत्तर आणि एच. पूर्व या ७ वॉर्डातच गोवरचा उद्रेक झालेला दिसतो. मुंबईत ७ संशयित रुग्णांचे मृत्यू झाले असून, आठवा मृत्यू मुंबईबाहेरचा आहे.

Measles : शनिवारी मुंबईत ११ नव्या रुग्णांची भर पडली असली तरी २७ बालके बरी होवून घरी गेली आहेत. कस्तुरबा, गोवंडी, राजावाडी यासह इतर रूग्णालयात ७३ रूग्ण दाखल असून ६२ रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. ९ जण ऑक्सिजनवर तर २ बालके व्हेटिलेंटरवर आहेत.

Measles : गोवर रोग आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने पूर्व उपनगरांत आणि पश्चिम उपनगरांतील झोपडपट्टयांमधील घरांचे सर्वेक्षण आणि लसीकरण युध्दपातळीवर सुरू केले आहे. आतापर्यंत २४,०२८४ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून १७४ बालकांना ताप आणि पुरळची लक्षणे आढळून आली आहेत. अतिरिक्त लसीकरणाची ८८४ सत्रे पार पडली आहेत.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT