Latest

Kurkumbh MIDC Explosion : कुरकुंभ एमआयडीसी हादरली! एक्सप्लिसिट केमिकल कंपनीत भीषण स्फोट

अमृता चौगुले

कुरकुंभ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील एक्सप्लिसिट केमिकल प्रा. लि. कंपनीत केमिकल बॅरलचा भीषण स्फोट होऊन आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. एक्सप्लिसिट केमिकल प्रा. लि. प्लाॅट नं ए ३२ या कंपनीतील स्टोअर रूममध्ये गुरूवारी (दि.१२) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सहा किलो सोडीयम मेटल केमिकल बॅरलचा भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

स्फोटानंतर केमिकल बॅरलने पेट घेतली. या आगीमुळे इतर केमिकल बॅरलला देखील आग लागली. आगीचे व धुराचे लोट हवेत उडत होते. घटनास्थळाच्या परिसरात कामगार नव्हते. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यादरम्यान चार अग्निशमन बंबाचा (फोम) वापर करण्यात आला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT