Latest

मारुतीने लॉन्च केली नवीन SUV FRONX, जाणून घ्या फीचर्स…

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑटो एक्सपो 2023 च्या दुसऱ्या दिवशी मारुती सुझुकी इंडियाने आज दोन SUV लॉन्च केल्या. जिम्‍नी आणि फ्रॉन्क्स (Maruti Fronx) या दोन SUV चे अनावरण करण्यात आले. त्याचे बुकिंगदेखील सुरू झाले आहे.

कशी असेल Maruti Fronx कार ?

कंपनीने फ्रॉन्क्स एसयूव्हीमध्ये हेड्स अप डिस्प्ले, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, 22.86 सेमी स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टिम, आर्किमिस साउंड सिस्टिम, वायरलेस अँड्रॉइड आणि ॲपल कार प्ले, ऑनबोर्ड व्हॉइस असिस्टंट, ओव्हर द एअर अपडेट्स, यूएसबी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, चार स्पीकर्स, ड्युअल टोन, TFT डिस्प्ले, गियर शिफ्ट इंडिकेटर, वायरलेस चार्जर, पॅडल शिफ्टर, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक फोल्डेबल ORVM, इंजिन पुश स्टार्ट/स्टॉप बटण, कीलेस एंट्री, स्टेरिंग माउंटेड कंट्रोल्स, 60:40 स्प्लिट सीट्स, पॉवर विंडोज, क्लायमेट कंट्रोल या एसयूव्हीमध्ये मागील एसी व्हेंट्ससारखी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.

फ्रॉन्क्स ही मारुती सुझुकीची नवीन SUV आहे. हे पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. फ्रॉन्क्स ही सिग्मा, डेल्टा, डेल्टा प्लस, जेटा आणि अल्फा या पाच प्रकारांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्‍ध असेल. जिम्‍नीप्रमाणेच  सिंगल आणि ड्युअल टोन कलर स्कीममध्येही ऑफर केले गेले आहे. ही SUV मोनो टोनमध्ये पाच रंगांच्या पर्यायांसह आणि ड्युअल टोनमध्ये तीन रंगांच्या पर्यायांसह उपलब्ध असेल. यामध्ये आर्क्टिक व्हाइट, अर्थ ब्राउन, ओपलनट रेड आणि सिल्व्हर यांचा समावेश आहे. किंमत सुमारे 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल असा प्राथमिक अंदाज आहे.

Maruti Fronx चे इंजिन कसे आहे?

(Maruti Fronx) फ्रॉन्क्समध्ये कंपनीने दोन इंजिन पर्याय दिले आहेत. पहिले इंजिन 1.2 लिटरचे सिरीज इंजिन आहे तर दुसरे 1 लिटर चे टर्बो सिरीज इंजिन आहे. SUV ला 1.2 लीटर ड्युअल जेट VVT इंजिनमधून 89.73 PS पॉवर आणि 113 न्यूटन मीटर टॉर्क मिळेल. हे देखील Idle Start/Stop तंत्रज्ञानासह जोडले गेले आहे. 1.2 लिटर इंजिनसह, SUV ला पाच-गियर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा देखील पर्याय आहे.

एक लिटरच्या टर्बो सीरीज SUV इंजिनला 100.06 PS पॉवर आणि 147.6 न्यूटन मीटर टॉर्क देते. या इंजिनसह उपलब्ध असलेल्या एसयूव्हीमध्ये स्टार्ट/स्टॉप, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, इलेक्ट्रिक टॉर्क असिस्ट तंत्रज्ञान आहे. यासोबतच एसयूव्हीमध्ये फाइव्ह स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. SUV ला दोन्ही इंजिन प्रकारांसह 37 लीटरची इंधन टाकी मिळते. समोर डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक आहेत. तसेच 195/60 R16 चे टायर आहेत.

सुरक्षितता

SUV मधील सेफ्टी फीचरमध्ये ESP, हिल होल्ड असिस्ट, साइड आणि कर्टन एअरबॅग्ज, ड्युअल व फ्रंट एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रिक रेअर डिफॉगर, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, लाइव्ह व्हेईकल ट्रॅकिंग, लोकेशन शेअरिंग, ओव्हर स्पीड अलर्ट, सीट बेल्ट अलर्ट, यांचा समावेश आहे. इमोबिलायझर, इमर्जन्सी अलर्ट, ब्रेक डाउन नोटिफिकेशन, स्टोलन व्हेईकल नोटिफिकेशन आणि टो अवे आणि ट्रॅकिंग यासारख्या सुविधा उपलब्ध असतील.फ्रॉन्क्सची लांबी 3.995 मीटर, रुंदी 1.765 मीटर, उंची 1.550 मीटर,व्हीलबेस 2520 मिमी आहे. त्याची टर्निंग रेडीयस 4.9 मीटर आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT