Latest

Maruti Suzuki Grand Vitara : मारूती सुझुकीची ही नवी एसयुव्ही लवकरच होणार लॉन्च; जाणून घ्या कशी असेल नवी कार

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मारूती सुझुकीने कार चाहत्यांसाठी त्यांच्या आगामी नव्या मॉडेल संबंधी खूशखबर दिली आहे. मारूती सुझुकी लवकरच ग्रँड विटारा (Maruti Suzuki Grand Vitara) ही कार लॉन्च करणार आहे. त्यामुळे आता कार ग्राहकांसाठी त्यांच्या या नव्या दमदार कारची जास्त वाट पहावी लागणार नाही. कंपनीची ही पहिली हायब्रिड कार आहे. याचे उत्पादन पुढील महिन्यापासून सुरू होईल आणि लॉन्चिंग सप्टेंबर महिन्यात होईल अशी प्राथमिक माहिती आहे. 11 हजार रुपयांची टोकन रक्कम देऊन बुकिंग करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.

तंत्रज्ञानाच्या मदतीने ही कार 27.97 किमी पर्यंत मायलेज

मारुती सुझुकीने ग्रँड विटाराची किंमत किती असेल याची माहिती दिली नाही. पण, कंपनीने एक अतिशय मनोरंजक माहिती दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड तंत्रज्ञानाच्या मदतीने ही कार 27.97 किमी पर्यंत मायलेज देऊ शकते. यासोबतच कंपनीने असा दावा देखील केला आहे की, बी सेगमेंटमधील कोणतीही एसयूव्ही इतके मायलेज देत नाही, जितकी ही कार मायलेज देते. या कारला बाजारपेठेतील Hyundai Creta, Skoda Kushk आणि Volkswagen Tigon सारख्या कारशी टक्कर द्यावी लागेल.

ही कार दोन पॉवरट्रेनमध्ये येईल. एक 1462cc पेट्रोल इंजिनसह स्मार्ट हायब्रिड असेल, जे 5 स्पीड एमटी आणि 6 स्पीड एटीसह येईल. आणि दुसरे इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड असलेले 1490cc पेट्रोल इंजिन असेल जे फक्त ई-CVT सह येईल. त्याचे मायलेज सर्वाधिक 27.97 किमी असेल. विशेष म्हणजे ही कार स्मार्ट हायब्रिड (माइल्ड हायब्रीड) मध्ये AllGrip फिचर्सनी सुसज्ज असेल. आणखी काही फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात एक हेड-अप डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, 9-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आणि हवेशीर जागा आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT