पुढारी ऑनलाईन: मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मार्केटमधून आपल्या १७ हजार ३६२ गाड्या परत मागवल्या आहेत. एअरबॅग कंट्रोलरमध्ये बिघाड असल्याने कंपनीकडून हा निर्णय घेतला आहे. या यादीत Alto K10, S-Presso, Eeco, Brezza, Baleno आणि Grand Vitara मॉडेल्सचा समावेश आहे.
एअरबॅग कंट्रोलरमध्ये बिघाड असल्याने ही वाहने परत मागवली जात आहेत, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. परत मागवलेल्या वाहनांमध्ये आवश्यक असल्यास एअरबॅग कंट्रोलरची तपासणी आणि आवश्यक असल्यास बदली करणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. परत मागवण्यात आलेल्या मारुती सुझुकीच्या मॉडेल्सचे उत्पादन हे ८ डिसेंबर 2022 ते १२ जानेवारी 2023 च्या दरम्यान करण्यात आल्याचेही कंपनीने म्हटले आहे.