Latest

IPL 2022 : केएल राहुलच्या ‘लखनऊ’ संघाला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू IPL मधून बाहेर!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 (IPL 2022) सुरू होण्यापूर्वी लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे आयपीएल 2022 (IPL 2022) मधून बाहेर पडणारा तो इंग्लंडचा तिसरा खेळाडू आहे. त्याच्याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा अॅलेक्स हेल्स आणि गुजरात टायटन्सचा जेसन रॉय हेही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मार्क वुड इंग्लंडकडून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळत असताना त्याला दुखापत झाली. मात्र, लखनऊ संघाने त्याच्या जागी नव्या खेळाडूचा समावेश केल्याचे अद्याप तरी वृत्त समोर आलेले नाही.

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात लखनऊ फ्रँचायझीने (Lucknow Super Giants) मार्क वुड (Mark Wood)ला 7.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. दुखापतीमुळे त्याला आयपीएल 2022 मधून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे लखनऊचा संघ मोठ्या संकटात सापडला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) लखनऊ फ्रँचायझीला वुडच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. फ्रँचायझीकडे निवडण्यासाठी काही पर्याय आहेत. मात्र, अद्याप कोणाचेही नाव निश्चित झालेले नाही.

आयपीएल 2018 मध्ये वुड (Mark Wood) फक्त एकच सामना खेळला. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्ज (CSK) फ्रँचायझीचा एक भाग होता. मार्क वुड, सध्या जगातील सर्वोत्कृष्ट मर्यादित षटकांच्या गोलंदाजांपैकी एक आहे. आयपीएल 2022 हंगामासाठी तो लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील झाल्याने चाहते उत्साहित झाले होते.

मार्क वुड व्यतिरिक्त लखनऊमध्ये जेसन होल्डर (वेस्ट इंडिज), मार्कस स्टॉइनिस (ऑस्ट्रेलिया) आणि दुष्मंता चमिरा (श्रीलंका) हे परदेशी खेळाडू आहेत. यापैकी होल्डर आणि स्टॉइनिस हे पहिल्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसतील. कारण इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौ-यावर आहेत. त्याचबरोबर चमीरा भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही खेळला नाही, पण आता तो तंदुरुस्त असून खेळण्यासाठी तयार असल्याचे समजते आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT