Latest

दिल्लीतील हवा गुणवत्तेत किरकोळ सुधारणा

मोहन कारंडे
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले असल्याचे हवामान खात्याकडून रविवारी सांगण्यात आले. वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हवेतील प्रदूषण कमी झाले असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पाचट (धान्याचे अवशेष) जाळल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे गॅस चेंबर बनले आहे. शनिवारी राजधानीतील सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३८१ इतका होता. तो रविवारी सकाळी ३४५ पर्यंत खाली आला होता. पुढील दोन दिवसांत एक्यूआयमध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. एक्यूआय ३०१ ते ४०० च्या दरम्यान असेल तर हवा अत्यंत खराब मानली जाते.
हेही वाचा :
SCROLL FOR NEXT