Latest

Maratha reservation : जरांगे-पाटील यांनी आंदोलनासंदर्भात केले ‘हे’ आवाहन

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठी आंदोलन शांततेत सुरु राहील, असे स्पष्ट करत दररोज दोन टप्प्यात रास्ता रोको आंदोलन होईल. रविवार (दि.२४) पासून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन केले जाईल, ३ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन केले जाईल. या पुढील मराठा आरक्षणासाठी केलेले आंदाेलन हे देशातील सर्वात मोठे आंदोलन असेल, अशी माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि.२१) पत्रकार परिषदेत दिली. (Manoj Jarange appeal For Rasta Roko Movement )

Maratha reservation : जरांगे-पाटील यांनी केलेले आवाहन

  • येत्या २४ फेब्रुवारीपासुन (रविवारी) राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन करावे
  • २४ फेब्रवारीपासून दररोज सकाळी १०.३० ते दुपारी १ दरम्यान रास्‍ता राेकाे आंदोलन करावे. ज्यांना ही वेळ जमत नसेल त्यांनी दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत करावे.
  • आंदोलन शांततेत पार पडेल याची काळजी घ्यावी.
  • आमदारांना गावबंदी नाही, मात्र कोणताही राजकीय नेता दारी आला की दार बंद करावे.
  • रोज रास्ता रोको आंदोलन करुन सरकारला निवेदने द्यावे.
  • आंदोलन दरम्यान कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • विद्यार्थ्यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करु नये.
  • कायदा, आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मराठा समाजातील सर्व वृद्धांनीही या आंदोलनाला बसावे.
  • आंदोलनाला बसताना एका रांगेत सर्वांनी उपोषणाला बसावे.
  • १ मार्च रोजी राज्यभरातील मराठा लोकप्रतिनिधींची बैठक होईल.
  • ३ मार्च राेजी जगातील सर्वात मोठा रास्ता रोको आंदोलन करा.
  • राज्यात ३ मार्च राेजी सर्व जिल्ह्यात सकाळी १२ ते १ रास्‍ता राेकाे आंदोलन करावे.
  • ३ मार्चच्या रास्ता रोकाेनंतर  मुंबईतील आंदोलनाची दिशा स्पष्ट करु.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT