Latest

Maratha Reservation Meeting: मराठा आरक्षणप्रश्नी सह्याद्रीवर बैठक सुरू, जरांगे-पाटील ऑनलाईन उपस्थित राहणार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: मराठा आरक्षणावर आज (दि.२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या आरक्षणप्रश्नी उपसमितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री बंगल्यावर होत आहे. या बैठकीला मनोज जरांगे-पाटील सरकारसोबतच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (Maratha Reservation Meeting)

मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबई दौऱ्यावर सरकार अलर्ट मोडवर आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित आहेत. तर जरांगे पाटील हे उपोषणस्थ अंतरवली सराटी येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला हजेरी लावणार आहेत. (Maratha Reservation Meeting)

मराठा आरक्षण हसण्यावर घेऊ नका; जरांगे-पाटलांचा इशारा

आज ४ वाजता बैठक होणार असल्याचे सरकारकडून दोनवेळा निरोप मिळाला, मात्र अद्याप सहभागी करून घेतले नाही. सहभागी करून घेतले तरी चालेल अन् नाही तरी चालेल आम्हाला जे करायचे ते आम्ही करूच असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षण हसण्यावर घेऊ नका, बैठकीत काहीही झाले तरी मुंबईला जाणारच, आधी कायदा करा या मागणीवर जरांगे-पाटील ठाम असल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले. (Maratha Reservation Meeting)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT