Latest

Maratha reservation : राज्‍य सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल : वडेट्टीवार

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिल्‍ह्याचा पाेलीस अधीक्षक जेव्हा आदेश देतो तेव्हा त्‍याची जबाबदारी ही सरकारची असते. मराठा आंदोलकांवर लाठीमार प्रकरणी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने माफी मागितली. हे मराठा बांधवांना कितपत आनंददायी आहे हे येणारा काळच सांगेल; पण ही घटना पुरस्कृत होती, हे सिद्ध झालं आहे, असा दावा करत विधानसभेचे विराेधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. (Maratha reservation)

Maratha reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही

माध्‍यमांशी बाेलताना वडेट्टीवार म्हणाले की, "मराठा आरक्षणावर तोडगा निघालाच पाहिजे. जालना येथे मनोज जरांगे-पाटील गेले काही दिवस आंदोलन करत हाेते. ते मराठा समाजासाठी लढत आहे. बहुमतातील सरकार राज्यात आणि केंद्रात आहे त्यांनी मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढला पाहिजे. ओबीसींच्या आरक्षण वाढवून मराठ्यांना आरक्षण द्या. मी ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही. आरक्षण वाढवून देण्याच काम केंद्र सरकारच आहे, इच्छाशक्ती असेल तर याच महिन्याच्या शेवटी हा विषय संपेल"

 मराठा आरक्षणप्रश्‍नी राज्‍य सरकर वेगळी वेगळी भूमिका घेत आहे.तर भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष बावनकुळे यांचे मत वेगळे आहे. हा मराठा समाजाला फसवण्याचा प्रकार आहे. आहे. आंदोलनावर लाठीचार्ज केल्यानंतर जो काही राज्यात असंतोषाच वातावरण निर्माण झालं त्यावर आता पांघरुण घालण्याच काम सुरु आहे, असा आराेपही त्‍यांनी केला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT