Latest

लातुरात मराठा क्रांती मोर्चाची रॅली, बंदचे आवाहन, पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध

निलेश पोतदार

लातूर; पुढारी वृतसेवा मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणासाठी बसलेल्‍या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्‍याने सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर बंदचे आवाहन करत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

सकाळी १० वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाजबांधव मोठ्या संख्येने जमले. शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्यांनी तेथून रॅली काढली. राजीव गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, पीव्ही आर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, गांधी चौक, गंजगोलाई, छत्रपती शाहू महाराज चौक, गरुड चौक, महात्मा बसवेश्वर चौक असा रॅलीचा मार्ग असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले. आंदोलक या घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत सर्वांना बंदचे आवाहन करीत होते. या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्याचे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT