Latest

रोज अंडी खाणं शरीरासाठी किती फायदेशीर ? जाणून घ्या

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्यापैकी अनेकांच्या आहारात अंड्याचा समावेश असतो. रोजच्या जेवणात अंडी खाण्यावरून अनेक समज-गैरसमज आहेत.  जाणून घेवूया अंडी दरदोज खाणं शरीरासाठी किती फायदेशीर ठरते याविषयी….

  •  तुम्हाला माहिती आहे का ? अंडी खाणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अंड्यात असलेल्या अँटीऑक्सिडेंट ल्यूटिन आणि जेक्सॅथिन या घटकांमुळे डोळ्यांवर वयानुसार होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करते. अंड्याच्या बलकामध्ये हे घटक आढळतात.
  •  तुम्ही फिटनेसच्या बाबत जागरूक असाल तर अंडी हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अंड्यात असलेल्या प्रोटीनमुळे पोट खूपवेळ भरलेलं राहातच. त्‍यामुळे भूकेची तीव्रता कमी होण्‍यास मदत होते. याशिवाय शरीराची प्रोटीनची गरजही भागवली जाते.
  • अंड्यात कॅल्शियम, ओमेगा-3 फॅटी ॲसिड  यांची मात्रा भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय हे घटक शरीरातील गुड कॉलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात.
  • अंड्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन 'डी'मुळे हाड मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे दुधाव्यतिरिक्त अंडी हा प्रोटीन आणि  कॅल्शीयमचा उत्तम सोर्स आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT